नांदगांव पेठ- 8 डिसेंबरला संत जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचे शासनाचे आदेश असल्याने सोमवारी अखिल तेली समाज संघटनेच्या वतीने नांदगांव पेठ येथील सर्व शासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालय, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायतला संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. महाराष्ट्र शासनाने नव्याने काढलेल्या अध्यादेशात संत जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले. अखिल तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर साखरवाडे यांनी संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा सर्व शासकीय कार्यालयात लावण्यासंबंधी आवाहन केले होते. त्यानिमित्ताने सोमवारी अखिल तेली समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नांदगांव पेठ येथील ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालय, जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, तलाठी कार्यालय पत्रकार संघ कार्यालय आदी ठिकाणी संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर साखरवाडे, पत्रकार मंगेश तायडे, अमोल हटवार, विजय शिरभाते, गौरव साखरवाडे, मनोज हटवार, सुनील धर्माळे, श्रीकृष्ण साकोरे, रमेश साकोरे, शिवा साठवणे, प्रविण गिरपुंजे यांचे सह अखिल तेली समाज संघटनेचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.